आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोगमुक्त, दर्जेदार उत्पादन:ईश्वेद बायोटेक-इस्त्रेल कंपनीतील‎ करार शेतकऱ्यांसाठी वरदान‎

देऊळगावराजा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा तालुक्यातील ‎ माळसावरगाव येथील ईश्वेद‎ बायोटेकने ग्रामीण भागात नवी कृषी ‎ ‎ क्रांती केली असून, आधुनिक ‎ ‎ऊतिसंवर्धित तंत्रज्ञानाने फळबाग व‎ ‎वनशेती रोपे विकसित केली आहेत. ‎ ‎

यामध्ये आणखी भर पडली असून,‎ केळी या पिकात रोगमुक्त आणि‎ चांगले उत्पादन देणारे वाण विकसित ‎ ‎ करण्यासाठी ईश्वेद बायोटेक व‎ इस्त्रेल कंपनीमध्ये करार झाला आहे.‎१६ डिसेंबर रोजी झालेल्या या‎ कराराद्वारे ईश्वेद टिश्यू कल्चर प्लांट‎ आणि सीड्स निर्यात करणार आहे.‎ तसेच इस्त्रेल तंत्रज्ञानही‎ देवाण-घेवाण करणार असल्याने हा‎ करार ईश्वेद आणि शेतकऱ्यांसाठी‎ वरदान ठरणार आहे, अशी माहिती‎ ईश्वेद बायोटेकचे कार्यकारी‎ संचालक संजय वायाळ, अक्षय‎ वायाळ यांनी दिली आहे.

ईश्वेद‎ बायोटेकने टिश्यू कल्चर प्लांट आणि‎ बियाणे क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.‎ शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी‎ केळीसह पेरू, डाळींब, आंबा,‎ जांभूळ, कीवी, अंजीर तसेच‎ सीताफळाची रोपे उपलब्ध करून‎ दिली आहेत. यासोबतच फळबाग व‎ भाजीपाला या क्षेत्रात ईश्वेद बायोटेक‎ शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास‎ धरायला लावत दर्जेदार रोपे उपलब्ध‎ करून देत आहे.

बातम्या आणखी आहेत...