आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात बुलडाणा शहरालगत कृषी संशोधन केंद्राच्या शासकीय जागेत कृषी महाविद्यालय पंधरा दिवसात सुरु होणार आहे. तर बोदवड सिंचन उपसा सिंचन योजना तातडीने सुरु करणे यासह एमआयडीसी, बुलडाणा येथील रिंगरोड, राजूर घाटातील एकेरी वाहतूक, येळगावच्या पडीक जागेत पर्यटन केंद्र उभारणे, मोताळा डोंगरी विकास योजनेमध्ये गावांचा समावेश करणे, बुलडाणा येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेली जुन्या डी. एड होस्टेलची पडीक जागा सिव्हील सेंटर उद्यान व पार्किंग करिता नगर परिषदेकडे हस्तांतरित करणे यासह इतर विकासात्मक कामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन कामाला मान्यता देण्याचे सूचित केले आहे, अशी माहिती आ. संजय गायकवाड यांनी दिली.
बुलडाणा व मोताळा तालुक्यातील बहुतांशी प्रकल्प मार्गी लागण्यासाठी २३ मार्च रोजी आ. संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री यांना पत्र सादर केले होते. त्या पत्रावर मुख्यमंत्री यांनी तातडीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच हे प्रकल्प सुरु होऊन विधानसभा मतदार संघात औद्योगिक, बेरोजगारी, सिंचन व रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ. संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
यावेळी युवा सेनेचे मृत्युंजय गायकवाड, तालुका प्रमुख धनंजय बारोटे, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे याची उपस्थिती होती. यावेळी आ. गायकवाड म्हणाले की, कृषी संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय आ.एकनाथ खडसे कृषी व पालकमंत्री हाेते तेव्हा मोताळा तालुक्यात मंजुर होते त्या नंतर भाऊसाहेब फुंडकर पालकमंत्री झाले परंतु हे महाविद्यालय झाले नाही.
या आधीच्या आमदारांनी ते केले नाही व त्या आधीच्या पंधरा वर्षात ते झाले नाही. मात्र आता ६०० विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय बुलडाण्यात सुरु होणार आहे. मोताळा व बुलडाणा तालुक्यात एमआयडीसी चे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे रोजगार वाढणार आहे. गिरडा येथे डॅम उभारणे तर मूर्ती येथे सिंचन वाढवण्याची निर्मिती करण्यासाठी हिरमोड धरणाची उंची वाढवणे मोहेगाव नदीचे पाणी धरणात लिफ्ट करणे आदी कामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मलकापूर-सोलापूर महामार्ग बुलडाण्यातून जातो. हा रस्ता सहापदरी करण्यासाठी ज्या जागा अतिक्रमणात आहे त्या काढणे व काही जागा खरेदी कराव्या लागणार आहे. या महामार्गालगत असलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जुन्या नॉर्मल स्कुल ची ९० हजार ५८२ चौरस मीटर जागेपैकी ९७०० चौरस मीटर जागा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारती करता हस्तांतरण करणे. जुन्या डी.एड ची १७९७९ चौरस मीटर पडीत जागा सिव्हील सेंटर, उद्यान व पार्किंग करता नगर पालिकेकडे हस्तांतरित करणे आदींबाबतही सकारात्मक विचार करण्यात आला असून संबधित अधिकारी यांना सूचना करण्यात आल्याचे आ.गायकवाड यांनी सांगितले.

Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.