आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषि मार्गदर्शन:शिंदी येथील शेतकऱ्यांना कृषिदूतांचे मार्गदर्शन; बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन दाखवले

​​​​​​​बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम येथील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शिंदी ग्रामस्थांकरीता शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी सरपंच विनोद खरात, पोलिस पाटील मदनराव हाडे, पंजाबराव हाडे, नितीन खरात, मोहित बंगाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

विद्यार्थी भारत कऱ्हाडे, आशुतोष गावंडे, संकेत बाहेकर यांनी ग्रामस्थांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी विद्यार्थ्याना प्रा. डॉ. सुभाष कालवे, प्रा. मनोज खोडके, प्रा. समाधान जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.