आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:पाण्यात बुडून अकोला येथील युवकाचा मृत्यू; मामा भाचा डोहाने घेतला आणखी एक बळी

संग्रामपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत शेकडो जणांचे जीव घेणाऱ्या हिवरखेड जवळील वारी हनुमान येथील प्रसिद्ध असलेल्या मामा भाचा डोहाने आज ४ मे रोजी पुन्हा एक बळी घेतला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून डोह बुजवण्याची मागणी पुर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.अकोला येथील बावीस वर्षीय युवक राजू सुनिल गुडधे हा मोहित सुनिल नागदेव व ऋषभ संजय सोनुने या दोन मित्रासह दुचाकीने वारी हनुमान येथे दर्शनासाठी आला होता.

त्यापैकी ऋषभ संजय सोनुने हा दर्शनासाठी मंदिरात गेला तर राजू गुडधे व मोहित नागदेव यांना आंघोळ करण्याचा मोह सुटला. त्यामुळे ते दोघेही आंघोळ करण्यासाठी मामा भाचा डोहाकडे गेले. डोहाच्या काठावर आंघोळ करीत असताना अचानक राजू गुडधे यांचा पाय घसरल्यामुळे तो डोहातील खोल पाण्यात जावून पडला या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वारी सरपंच शिवाजी पतिंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना दिली. पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक गोपाल दातीर व विनोद इंगळे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...