आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:अलकाश्रीजी यांच्या सुंदरकाण्ड पठण, महाशिबिराचे आयोजन; माजी आमदार दिलीप सानंदा यांचे आवाहन

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्व.विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून २६ मे रोजी अरजण खिमजी नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात रुग्णांच्या सेवेसाठी निःशुल्क महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे विदर्भ मीरा अलकाश्री यांच्या अमृतवाणीतून सुंदरकाण्ड पठन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिराला व सुंदरकाण्ड पठन कार्यक्रमाला राज्यातील जिल्हयातील जनप्रतिनिधींची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार दिलीप सानंदा यांनी केले आहे.

या महाआरोग्य शिबिरामध्ये जळगाव खान्देश येथील डॉ.उल्हास पाटील रुग्णालय व शासकीय महाविद्यालय अकोला येथील तज्ञ डॉक्टर व सर्व सर्जन यांच्या देखरेखीखाली रुग्णांची एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कॅन्सर तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब, नाक, कान, घसा तपासणी, अस्थिरोग निदान व उपचार,नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अ‍ॅन्जीओप्लास्टी, अ‍ॅन्जीयोग्राफी, २ डी ईसीजी, दंत चिकित्सा, गर्भपिशवी काढणे, महिलांच्या सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी आदींचा समावेश आहे. या शिबिरामध्ये तपासणी करीता येताना रुग्णांनी आधार कार्ड व रेशनकार्ड, डॉक्टरांची फाईल असल्यास सोबत आणावी. तरी महाआरोग्य शिबिर व अलकाश्री यांच्या अमृतवाणीतून होणाऱ्या सुंदरकाण्ड पठण श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आ.दिलीप सानंदा व श्री हरि सत्संग समिती यांच्या वतीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...