आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋणानुबंध:यशाचे सर्व श्रेय बुलडाण्याच्या आंबेडकरी चळवळीला

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रसिद्ध साहित्यिक नारायण जाधव येळगावकर यांना राज्य शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार जाहीर झाला आहे. यशोधरा या नाटकास सन २०२१ चा राम गणेश गडकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येळगावकर यांना यशोधरा दोन अंकी नाटकास सन २०२१ चा राम गणेश गडकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. येळगावकर यांच्या यशोधरा दोन अंकी नाटकाचे प्रकाशन पुणे येथील स्वयंदीप प्रकाशनाने केले आहे.

मुंबई, पुणे, पनवेल यासह अन्य भागांतून या नाटकाची मागणी वाढत आहे, अशी माहिती नारायण जाधव येळगावकर यांनी दिली. या यशाचे सर्व श्रेय बुलडाण्याच्या आंबेडकरी चळवळीला आहे. या चळवळीतूनच माझी जडणघडण झाली. माझ्या यशात समाजाचेही योगदान आहे. काळाच्या विस्मरणात आणि उपेक्षितांच्या पडद्याआड गेलेली यशोधरा दोन अंकी नाटकाच्या निमित्ताने जागतिक पातळीवर पुढे येत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...