आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज वाटपासाठी दिरंगाई:‘पीक कर्ज वाटप करा; अन्यथा आंदोलन’

संग्रामपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. परंतु बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक हे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी दिरंगाई करत असून त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची हेळसांड थांबवण्यासाठी तातडीने पीक कर्ज वाटपाला गती द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे यांनी आज शुक्रवारी निवेदनाद्वारे दिला आहे.

मागील काही वर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवणे गरजेचे आहे. परंतु असे न करता बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांना उद्धटपणाची वागणुक देऊन शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांनी बँकांकडे कागद पत्र देऊन सुद्धा पीक कर्जाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात विनाकारण शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्यात येत आहे. त्यातच पेरणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची दिवसें दिवस चिंता वाढत आहे. यापुढे कागदपत्रांची पूर्तता पुर्ण केलेल्या शेतकऱ्यांना सुरळीत पिक कर्ज वाटप करण्यात यावे, अन्यथा बँक विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. निवेदन देताना स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे, उज्ज्वल खराटे, राजेश उमाळे, प्रफुल्ल करागळे, आकाश कोठे, राहुल गिरी, गोपाल मारोडे, विशाल दुगाणे, अमोल मारोडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.