आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच निरोगी आरोग्यासाठी शारीरिक शिक्षण अंगीकारावे

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच निरोगी आरोग्यासाठी शारीरिक शिक्षण अंगीकारावे, असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णुपंत पाटील यांनी केले. येथील कला महाविद्यालयात २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्राचार्य विष्णुपंत पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश बाठे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. आपल्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. मनोज व्यवहारे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ व १९३६ या दरम्यान झालेल्या ऑलिम्पिक मध्ये भारताला हॉकी खेळात सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी मेजर ध्यानचंद यांची जी कामगिरी होती त्या प्रीत्यर्थ त्यांना हिटलरने हॉकीचे जादूगर ही पदवी बहाल केली. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आलेख प्राध्यापक मनोज व्यवहारे यांनी उपस्थितांसमोर मांडला.

त्यानंतर प्राचार्य डॉ. सुरेश बाठे यांनी मेजर ध्यानचंद यांनी ज्या परिस्थितीतून कष्ट करून खेळाचे कौशल्य आत्मसात केले आणि त्या जोरावर ऑलिम्पिक मध्ये जी मजल मारली आणि जो खेळ त्यांनी प्रदर्शित केला या पूर्ण त्यांच्या जीवनपटावर आपले विचार व्यक्त केले. पुढे बोलतांना प्राचार्य विष्णुपंत पाटील यांनी आजचा दिवस संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा अशाच थोर खेळाडू किंवा महापुरुषांचे आत्मचरित्र वाचून त्याचे आपल्या जीवनामध्ये कसे आकलन करता येईल. या वर विचार करावा, असे सांगीतले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह बीए भाग एक दोन आणि विभाग तीनचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...