आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कवितेतून घडले ग्रामीण जीवनाचे प्रखर दर्शन; मराठी भाषा ही भाकरीची भाषा झाली पाहिजे : दत्ता पाटील

बुलडाणा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषा ही दोन हजार वर्षांपूर्वीची असून तिचे संवर्धन झाले पाहिजे. मराठी भाषा ही भाकरीची भाषा झाली पाहिजे, असे प्रतिपादन दत्ता पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम यांनी मराठी भाषा समृद्ध भाषा असून जगात दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. जागतिकीकरणाच्या काळात अनेक भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात मराठी भाषेचे अस्तित्व या काळात टिकवायचे असेल तर तिचे संगोपन होणे काळाची गरज आहे. १ मे १९६० पासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे, असे सांगितले.

राजे छत्रपती कला महाविद्यालयात मराठी भाषादिना निमित्त मराठी वाङ्‌मय मंडळाच्या वतीने मराठी कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी दत्ता राहणे पाटील बोलत होते. यावेळी संजय दसरकर, उपप्राचार्य डॉ. नितीन जाधव हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रा.डॉ.गोविंद गायकी यांना कार्यक्रम आयोजनासंबंधी ची भूमिका मांडली व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी डॉ. नितीन जाधव, डॉ. भगवान गरूडे यांचे समयोचित भाषण झाली. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमानंतर रुख्मा राहणे यांच्या सूत्रसंचलनाखाली कवी संमेलन रंगत गेले. सुरूवातीला कवी दत्ता राहाणे यांनी आपल्या कवितेतून ग्रामीण जीवनाचे प्रखर दर्शन घडविले.

काहून रडतरे पोरा दूध नाही रे स्तनाला होती कालची उपासी फडके बांधून पोटाले

या कवितेने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर विदर्भाची बहिणाबाई चौधरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रख्माबाई राहणे यांनी मुलगा आणि मुलगी यात भेद न करता मुलगी ही मुलापेक्षा कमी नाही हे कवितेतून मांडले.

मुलगी काही कमी नाही मुलापेक्षा थोर पौर्णिमेचं चांदण ती चंद्राची आहे कोर

ही कविता सादर करता मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रा.डॉ.नितीन जाधव यांनी पर्यावरण ऱ्हासावर आपली कविता सादर करून रसिकांनी अंतर्मुख केले.

माणूस आता माणूस राहिला नाही म्हणून निसर्ग कोपतो आहे असंख्य सुया टोचून अंगात मायच्या रक्तासारखं पाणी शोषतो आहे.

सपना खोलगडे या नवोदित कवयित्रीने पावसावर कविता सादर केली. डॉ. गोविंद गायकी यांनी मैना आणि पाकोळी या कविता सादर करून कविसंमेलनात रंगत भरली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा रेवेकर हिने केले. तर आभार कीर्ती रेवेकर हिने केले. कार्यक्रमाला विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

बातम्या आणखी आहेत...