आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:भरधाव कारच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू ; खडकी फाट्यावरील घटना

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या कारने फाट्यावर उभे असलेल्या एका ८४ वर्षीय वृद्धास जबर धडक दिली. या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बुलडाणा- मोताळा मार्गावरील खडकी फाट्यावर घडली. प्रकरणी बोराखेडी पोलिसात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील रामकृष्ण भिका देवकर हे ८४ वर्षीय वृद्ध त्यांच्या नातेवाइकांकडे जाण्यासाठी रविवारी खडकी फाट्यावर उभे होते. दरम्यान, सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मलकापूरकडून बुलडाण्याकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून त्या व़ृद्धास जबर धडक दिली. या अपघातात रामकृष्ण देवकर हे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच चालकाने कारसह तेथून पलायन केले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने गंभीर जखमी असलेल्या देवकर यांना बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून रामकृष्ण देवकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील रवी माणिकराव देवकर यांनी दिली. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिकरीक्षक अशोक रोकडे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...