आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला. या अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास खंडाळा फाट्याजवळ घडली. यात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
औरंगाबादहून नागपूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद आगाराची बस क्रमांक एमएच २० बीएल ३३१४ ही इतर वाहनास ओव्हरटेक करत असतांना समोरील दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम. एच. २१ बीएच ९७९७ वर धडकली. दोन्ही वाहनांची आपसात झालेली धडक इतकी जबरदस्त होती की, एसटी बसची समोरील बाजू पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली. बस चालक प्रताप पंढरी मुंढे आणि वाहक संतोष विश्वनाथ आठवले औरंगाबाद आगार या दोघांसह बसमधील इतर १३ प्रवाशी गंभीर जखमी झाले तर ८ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्णवाहिकेद्वारे मेहकरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. १५ जखमींना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे नेण्यात आले. या सर्व जखमींवर बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
जखमींमध्ये बस चालक, वाहकाचाही समावेश
जखमी झालेल्यांमध्ये बसचे चालक, वाहक आणि गजानन माणिक बांगर रा. वाशीम, गोकर्णा पप्पू हाके, शिवकन्या पप्पू हाके रा. बिहरगाव (जिल्हा यवतमाळ), हनुमान वसंत व्यवहारे रा. पुसद, रोशनी जगन कहीरले रा. वाशीम, भाऊसाहेब केशव तुपे बाबलगाव, संगीता विष्णू लादे रा. मेहकर, सुरेश पांडुरंग पवार रा. नायगाव तालुका दारव्हा, सुरेश चिनकुजी काळे, सय्यद आयुब, मुमताजबी सय्यद रा. मालेगाव, अर्जुन लक्ष्मण अवसरमोल, गजानन विश्वनाथ अवसरमोल, कोमल गजानन अवसरमोल रा. कल्याणा, मंदा शंकर वावले, पौर्णिमा शंकर वावले रा. गोरेगाव, दीपक द्वारकादास दराडे, भाग्यश्री दीपक दराडे रा. हसनाबाद, अमोल विष्णू शेटे, वैभव विष्णू शेटे रा.वझर सरकटे, उमा अशोक काळबांडे रा. कोकलगाव जिल्हा वाशीम यांचा समावेश आहे. डोणगाव पोलिस अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.