आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याचे लाखो‎ रुपयांचे नुकसान:वीर पांगरा येथील तुरीच्या‎ गंजीला अज्ञाताकडून आग‎

बुलडाणा‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणार तालुक्यातील बिबी पोलिस स्टेशन‎ हद्दीत येत असलेल्या वीर पांगरा येथे ४‎ जानेवारीच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास‎ अज्ञाताने तीन एकरातील तुरीची गंजीला आग‎ लावल्याची घटना उघडकीस आली.‎ लावलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचे लाखो‎ रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त‎ करण्यात येत आहे. या घटनांमुळे ग्रामीण‎ भागात शेतमालाच्या सुड्यांना आग‎ लावण्याच्या घटना थांबताना दिसून येत आहे.‎ सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त‎ झालेला आहे.‎ वीर पांगरा येथील शेतकरी विठोबा तुकाराम‎ जायभाये त्यांच्या तुरीच्या गंजीला अज्ञात‎ व्यक्तीने आग लावली.‎

ही घटना ४ जानेवारीच्या रात्री दोन वाजेच्या‎ सुमारास गावकऱ्यांच्या लक्षात आली. परंतु या‎ घटनेत संपूर्ण सुडीची राख झालेली होती. या‎ घटनेत तुरीची सुडी जळाल्याने अंदाजे लाखो‎ रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी पुत्र योगेश‎ जायभाये यांनी सांगितले. असे प्रकार बिबी‎ पोलिस स्टेशन हद्दीत सतत घडत आहेत. परंतु‎ कारवाई केल्या जात नसल्याचा आरोपही‎ शेतकऱ्याने केला आहे.‎ या प्रकरणी नवनियुक्त ठाणेदार सदानंद‎ सोनकांबळे यांनी अज्ञात आरोपीचा शोध‎ घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी‎ शेतकरी वर्गाकडून होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...