आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात जागीच ठार:अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार

नांदुरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरुन येणाऱ्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात बत्तीस वर्षीय युवक जागीच ठार झाला आहे. ही घटना जळगाव जामोद रोडवरील येरळी पुला जवळ ५ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. अमोल सुपडा रोजतकार वय ३२ रा. अकोला खुर्द असे मृत युवकाचे नाव आहे.

तालुक्यातील अकोला खुर्द येथील अमोल रोजतकार व त्याचा मित्र नांदुरा येथून अकोला खुर्द येथे दुचाकीने घरी जात होते. जळगाव जामोद रोडवरील येरळी नदीच्या पुलाजवळ येताच त्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्यामुळे अमोलचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवुन त्याला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे हलवण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी रुग्ण वाहिका चालक गणेश वनारे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...