आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांना अडवले

बुलडाणा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथे शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आले असता रात्री आठच्या सुमारास धामणगावबढे येथे रस्त्यावरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली. अंगणवाडी सेविका मदतनीसांनी सरकारने दिवाळी पूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या मानधनवाढीचा अधिकृत शासन निर्णय काढावा. तो किमान २२ हजार रूपयांपेक्षा कमी नसावा. तसेच ग्रॅज्युटीच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी यासह इतर प्रश्नाबाबत मागण्यांचे निवेदन सादर केले.

१ नोव्हेंबरला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी सीटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद समोर आंदोलन केले होते. जोपर्यंत सरकार सेविका मदतनीसांच्या मानधनात वाढ करत नाही तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत आमदार, खासदार, पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा वक्ते, लता उबाळे, उज्वला घोंगडे, सुनीता काकर, शोभा पवार, ज्योती बढे, दुर्गा सोनवणे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...