आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सुनगाव अंतर्गत येणाऱ्या मौजे जुनापाणी अंगणवाडी केंद्र मंजुरी नसताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या तोंडी आदेशानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी जळगाव जामोद यांनी १३ सप्टेंबर २०२२ रोजी आम्हाला विश्वासात न घेता सेविका नियुक्ती बेकायदेशिर केल्या प्रकरणी तसेच या नियुक्त्या रद्द करण्यात याव्या या मागणीकरीता तीन अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आज १३ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
मौजे जुनापाणी अंगणवाडी केंद्र मंजुरी मिळे पर्यंत लाभार्थी पुरक पोषण आहार व टीएचआर वाटप करिता तात्पुरता प्रभार ज्येष्ठते बाबत संबंधित बालविकास अधिकारी यांनी विचार न घेता बुलडाणा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तोंडी आदेशाने वर्षा धर्मे अंगणवाडी क्र.९ यांची नियुक्ती केल्याची तक्रार वरिष्ठांना देण्यात आली होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्पुरती सुनावणी घेवून मी केलेल्या नियुक्तीवर ठाम आहे.
राजकीय हस्तक्षेप असल्याने मी काही करु शकत नाही. तुम्ही तक्रार का केली असे उद्धट भाषेत आम्हाला गैरवर्तणूक करुन अपमानीत केले. यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व बाल विकास अधिकारी यांची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच बेकायदेशीर रित्या झालेली नियुक्ती रद्द करुन ज्येष्ठां प्रमाणे नियुक्ती करण्यात यावी व वरिष्ठांनी दखल न घेतल्याने आजपासून सविता पुंडलिक खवले, प्रमिला रामेश्वर तायडे, आम्रपाली विनोद अंदुरकार या तीन अंगणवाडी सेविकांनी उपोषण सुरू केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.