आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाईच्या तुलनेत किमान वेतन २६ हजार रूपये दरमहा मानधन देवुन त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासह इतर मागण्यांसाठी सिटूच्या नेतृत्वात जागतिक महिला दिनी अंगणवाडी सेविकेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सिटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी अंगणवाडी सेविकांनी घोषणाबाजी करून जिल्हा कचेरी परिसर दणाणून सोडला होता.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये ग्रामीण व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या महत्वाच्या योजनेत आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका मदतनीस, आणि शालेय पोषण आहार कामगार महिला या अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. त्यामुळे अाज विविध मागण्यांसाठी सीटूच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रतिभा पाटील, सरला मिश्रा, मंदा डोंगरदिवे, सुरेखा पवार, शोभा काळे, रश्मी दुबे, माया वाघ, जयश्रीताई तायडे, ललिता बोदडे, मंदा मिसाळ, उर्मिला माठे, राजश्री नेमाडे, उषा पडोळ, रूपाली गावंडे, जयश्री क्षिरसागर, सविता चोपडे, बेबी दाते, अनिता खडसे, वनमाला वानखेडे, अपेक्षा शिंगणे, सुजाता गवई, मीना नागरे, स्वाती वायाळ, रमा बोर्डे, सोनाली बोरबळे, निशा घोडे, कल्पना गवई, संगीता मादनकर, संगीता गवळीकर, अलका राजपूत, गंगा अंभोरे, कविता चव्हाण, विजया ठाकरे आदी सहभागी झाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.