आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:अतिक्रमण काढण्यासाठी अनिल दांडगे यांचे उपोषण सुरू; प्रशासनाने अद्यापही उपोषणाची दखल घेतली नाही

बुलडाणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोर केलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी जळगाव जामोद तालुक्यातील दिनापासून येथील रहिवासी अनिल दांडगे यांनी १ मे महाराष्ट्र दिनापासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस उजाडला आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

जळगाव जामोद तालुक्यातील दिनापासून येथील महादेव गोरे व त्यांच्या मुलाने आमच्या राहत्या घरासमोर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे माझ्यासह शेजाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणाबाबत ची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली असता त्यांनी अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे मी कुटुंबासह १५ ऑगष्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यावेळी सहा महिन्याच्या आत अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

परंतु आजपर्यंत हे अतिक्रमण काढण्यात आले नाही. त्यामुळे घरासमोर केलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश दिनापासून ग्रामपंचायतीला देण्यात यावे, या मागणीसाठी अनिल दांडगे यांनी १ मे महाराष्ट्र दिनापासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस उजाडला आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सुर उमटत आहे.

बातम्या आणखी आहेत...