आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराशा:फुलाला भाव नसल्याने शेतात सोडली जनावरे

धाड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झेंडूच्या फुलाला भाव नाही आणि मागणी देखील नाही. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळल्याने धाड येथील शेतकऱ्याने वैतागून झेंडू फुलांच्या शेतीत जनावरे सोडली.

देविदास राघो कोथळकर या शेतकऱ्याने एका एकरात झेंडूची लागवड केली होती. या फुल विक्रीतून चांगले उत्पन्न होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, बाजारपेठेत फुलांना मागणी नसल्यामुळे त्याची बेभाव विक्री केली जात आहे. बाजारपेठेत मागणीच नसल्याने शेतकऱ्याचा फुल शेतीचा हा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. एका एकरात झेंडूच्या फुलाची लागवड करण्यासाठी जवळपास एक लाख रुपयांचा खर्च आला. पोषक वातावरणामुळे फुलेही बहरली होती. परंतु, फुलाला मागणीच नसल्याने त्यांनी शेतात जनावरे सोडली आहेत.

बातम्या आणखी आहेत...