आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष‎:अर्थ संकल्पात गुरव समाजासाठी‎ महामंडळ स्थापनेची घोषणा

बुलडाणा‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर‎ करतांना गुरव समाजाच्या उन्नतीसाठी‎ महामंडळ स्थापन करण्याची घोषणा‎ करून या महामंडळास प्राथमिक‎ स्वरूपात ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर‎ करण्याची घोषणा केली आहे. याचे‎ स्वागत आज ९ मार्च रोजी बुलडाणा‎ येथील गुरव समाज बांधवांनी समाजाचे‎ राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह‎ जनसंपर्क कार्यालय शिवालय येथे फटाके‎ फोडून जल्लोषाने केले.‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरव‎ समाजाच्या उन्नतीसाठी संत काशीबा‎ महाराज गुरव युवा आर्थिक विकास‎ महामंडळ स्थापन करून ५० कोटी‎ रुपयांची तरतुदीची घोषणा केली होती.‎ त्याचीच वचन पूर्ती म्हणून आज अर्थ‎ मंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र‎ फडणवीस यांनी राज्याचा अर्थ‎ संकल्पातून केली.

यावेळी प.पू.अनंत‎ महाराज चिंचोळकर, दत्ता शिंदे, संजय‎ सपकाळ, पांडुरंग कावळे,भाजप कामगार‎ आघाडीचे जिल्हाध्यक्ष विश्राम पवार,‎ अण्णा पवार, शाहीर खांडेभराड, शाहीर‎ प्रमोद दांडगे, रवी चिंचोळकर, विजय‎ चिंचोळकर, दुर्गेश चिंचोळकर,मिलिंद‎ चिंचोळकर,प्रा विजय मोरे, सचिन‎ चिंचोळकर, सुमित चिंचोळकर, मीनाक्षी‎ चिंचोळकर, कावळे ताई,उषा‎ चिंचोळकर, मीना चिंचोळकर,आरती‎ सपकाळ, वंदना सपकाळ, प्रतिभा शिंदे,‎ प्रणिता चिंचोळकर, सारिका चिंचोळकर,‎ योगिता चिंचोळकर, अविनाश शेंडे, पवन‎ शिंदे,सुदर्शन कांबळे,सुदर्शन‎ पाटील,दीपक चौटकर, ऋषिकेश‎ गोरे,बाळू ठाकरे,किरण नाईक यांसह‎ भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व गुरव‎ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...