आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अवैध गर्भपातप्रकरणी‎ आणखी एकाला अटक‎

मोताळा‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या अवैध गर्भपात‎ प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी‎ एकास बोराखेडी पोलिसांनी सुरत येथून‎ अटक केली आहे.‎ मागील पाच वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील‎ गेवराई तालुक्यातील किनगाव येथील एका‎ दाम्पत्याने मुलाच्या हव्यासापोटी २०१७ मध्ये‎ गर्भलिंगाची तपासणी करून मुलीचा गर्भ‎ असल्याचे जाणून घेत गुळभेली येथील‎ ब्रिजलाल चव्हाण यांच्या राजूर येथे भाड्याने‎ घेतलेल्या खोलीत गर्भपात करून घेतला‎ होता.

परंतु ब्रिजलाल चव्हाण यांचे कोणतेही‎ वैद्यकीय शिक्षण झालेले नसतांना त्यांनी त्या‎ महिलेचा अवैध गर्भपात केल्यामुळे तिचा‎ अर्धवट गर्भपात झाला होता. त्यामुळे चव्हाण‎ याने महिलेस पुढील उपचारासाठी बुलडाणा‎ येथील दवाखान्यात घेऊन गेले होते‎ उपचारादरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक‎ झाल्याने तिला चव्हाण सोबत अकोला येथील‎ हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.

त्याठिकाणी‎ महिलेवर शस्त्रक्रिया करून मृतावस्थेत‎ असलेला मुलीचा गर्भ काढून तिच्यावर‎ उपचार करण्यात आले होते. या अवैध‎ गर्भपात प्रकरणी तक्रारीवरून संबंधितांवर‎ गुन्हा दाखल करण्यात आला होता. या‎ प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात‎ घेतले होते, तर या प्रकरणात सहभागी‎ असलेला वेस्ट बंगाल येथील पिंटू उर्फ प्रेमचंद‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बिस्वास यास मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा‎ येथून बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले‎ होते. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने‎ त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली‎ आहे.‎

अवैध गर्भपात प्रकरणात सहभागी‎ असलेल्या सुरत येथील डिंडोलो येथील विरेंद्र‎ भोलानाथ पटेल यास सहायक पोलिस‎ निरिक्षक विकास पाटील, नापोका दिपक‎ पवार आणी पोकॉ श्रीकांत चिंचोले यांनी‎ अटक केली. त्यास आज शनिवारी‎ न्यायालयात हजर केले असता त्यास‎ न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने‎ त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली‎ आहे. या गर्भपात प्रकरणातील एक आरोपी‎ फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.‎ पुढील तपास सपोनि विकास पाटील हे करत‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...