आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी शिबिर:अनुराधा मिशन’ परिणामकारक आरोग्य सुविधा देण्यास कटिबद्ध; राहुल बोंद्रे यांचे आश्वासन, अस्थिव्यंग तपासणी शिबिर

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील गरजू नागरिकांपर्यंत प्रभावी व परिणामकारक आरोग्य सुविधा पोहोचवण्यात अनुराधा मिशन व साधुवासवाणी मिशन सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट हात-पाय जोडणीचा प्रसंगी केले. अनुराधा मिशनच्या माध्यमातून आजवर विविध आजारांच्या हजारो शिबिरांचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले.

येथील महाराणा प्रताप इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या कृत्रिम हात - पाय जोडणी शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, राहुल बोंद्रे यांनी स्वतः उपस्थित राहुन महिला व पुरुष रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. या शिबिरामध्ये तब्बल २१८ रुग्णांच्या अवयवांच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच गरजू रुग्णांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. त्यांना येत्या १९ जून रोजी महाराणा प्रताप इनडोअर स्टेडिअम, अनुराधा नगर, चिखली येथे कृत्रिम अवयव बसवून देण्यात येणार आहेत.

शिबिरात साधू वासवाणी मिशन पुणे तर्फे डॉ. सलिल जैन, मिलिंद जाधव, सुशील ढगे, संजय जाधव यांनी रुग्णांना सेवा दिली. शिबिर प्रसंगी परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे,़गोपाल तुपकर,़ कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, सुरेश बोंद्रे, ठाणेदार लांडे, अजरुद्दीन काझी, दीपक खरात, दत्ताभाऊ खरात,़ अश्विन जाधव, प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी, प्राचार्य डॉ. अरूण नन्हई, प्राचार्य डॉ. आर. एच. काळे, प्राचार्य आर. आर. पागोरे, डॉ. जी. व्ही. बिहाणी, प्रा.एस.सोनटक्के, प्रा. एम. व्ही. तोटे, प्रा. एस. पी. पोपळघट, प्रा. गोपाल ठेंग, प्रा. ए. डी. गट्टानी, प्रा. शाहेबाज देशमुख, प्रा. व्ही. एस. धोटे, प्र. इ. बी. कोले, के. पी. भोंडे, आर. एल. मिसाळ, व्ही. पी. गव्हाड,़ राम सोनुने, ए. व्ही. साळवे, विजय म्हस्के, डोंगरदिवे, निहाल सौदागर, विजय हिवाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. यू. एम. जोशी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...