आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील २६ वर्षांपासून अविरतपणे रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा समजून तपासणी बरोबरच उपचारांसाठी सातत्यपूर्ण आरोग्य विषयक विविध शिबिरांचे आयोजन अनुराधा मिशनच्या माध्यमातून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचा शिवभावे जिवसेवेचा वसा माजी आमदार राहुल बोंद्रे हे अविरतपणे पुढे चालवित आहेत. अनुराधा मिशनच्या माध्यमातुन आजवर विविध आजारांचे शेकडो शिबिरे यशस्वी झाले असुन त्यात लाखो रुग्णांनी लाभ घेतला असल्याचे प्रतिपादन नेत्र चिकित्सक डॉ. विकास बाहेकर यांनी केले.
स्व. अनुराधा बोंद्रे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी पार पडलेल्या नेत्र चिकित्सा शिबिराला माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी उपस्थित राहुन महिला व पुरूष रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या या नेत्र तपासणी तथा रक्तदान शिबिराचा तालुकाभरातून आलेल्या गरजू रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये २२५० रुग्णांच्या विविध नेत्र तपासण्या करण्यात आल्या, तर १४२५ रुग्णांची चष्मे वाटप करीता निवड करण्यात आली. त्यांना येत्या २० जून रोजी मौनीबाबा संस्थान, चिखली येथे चष्मे वाटप करण्यात येणार आहे, तर यावेळी झालेल्या तपासणी अंती सुमारे ३५० रुग्ण शस्त्रक्रियेस पात्र ठरले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, डॉ. विकास बाहेकर,डॉ. राहुल जोशी, डॉ. बंगाळे, डॉ. प्रीतेश मोरे,डॉ. भविष्य गुरूदासाणी,डॉ. कुलदीप भोलानी,डॉ. आशुतोष गिरबिडे,डॉ. ओमकार पाटील,डॉ. पंकज शेटे, डॉ. ज्योत्स्ना गुल्हाने,डॉ. मकरंद महाजन, डॉ. ए.जी. पवार, डॉ.भूषण पेंढारकर, डॉ.तृप्ती निकाडे, डॉ. सृष्टी फिरके, डॉ.श्रृती गांधी, डॉ. राजेंद्र सवडतकर यांच्यासह आदींनी रुग्णांना सेवा दिली. यावेळी बुलडाणा जिवनधारा बुलडाणा अर्बन ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला.
या शिबिर प्रसंगी दीपक देशमाने, कुणाल बोंद्रे, अतहरोद्यीन काझी, ज्ञानेश्वर सुरूशे, डॉ. परीहार, किशोर साखरे, बिदुसिंग इंगळे, जका भाई, गोकुळ शिंगणे, डॉ. कैलास बियाणी, डॉ. अरूण नन्हई, डॉ. रवींद्र काळे, डॉ. रमेश पागोरे, प्रा. स्वप्नील कुडके, प्रा. बी.एम. जाधव, प्रा. जया नन्हई, प्रा. सुनील वळसे, विशाल मवाळ यांच्यासह अनुराधा मिशनच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.उन्मेश जोशी यांनी केले.
गरिबांच्या सेवेचे मनस्वी समाधान : राहुल बोंद्रे
स्व. अनुताईंच्या स्मृती दिना निमित्त १ मे रोजी गत ३ दशकांपासून अनुराधा मिशन व अनुराधा परिवाराच्या वतीने भव्य नेत्र चिकित्सा शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरांच्या माध्यमातून हजारो गरीब आणि सामान्य कुटुंबातील अबाल ते वृद्धांपर्यंत सर्व गरजू रुग्णांना मोफत औषधी, चष्मे वाटप, तसेच गरजू व पात्र रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येते. याचबरोबर विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी २६ वर्षांपासून अविरतपणे रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा या पावन कार्याचे, जनसेवेचे ब्रीद हाती घेवून अनुराधा मिशन व अनुराधा परिवार शिवभावे जिवसेवेचा वसा पुढे नेत आहेत. या शिबिरांच्या माध्ममातुन गोरगरिबांची सेवा आपल्या हातून घडत असल्याचे मनस्वी समाधान मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.