आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचा दूजाभाव:एपीएल कार्डधारक शेतकऱ्यांना तीन महिन्यांपासून रेशनचा गहू नाही ; तांदळापासून वंचित राहण्याची शक्यता

खामगाव / गिरीश पळसोदकर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील तीन लाख ७२ हजार ०२३ शेतकरी लाभार्थींना गेल्या तीन महिन्यांपासून गव्हाचे वाटप करण्यात आले नाही. प्रति चार किलाे गव्हाचे वाटप करण्यात येणार होते जवळपास १४ हजार ८८० क्विंटल गहु या शेतकऱ्यांसाठी लागणार होते. हे शेतकरी एपीएल केशरी कार्डधारकच आहेत. सरकारकडूनच गव्हाचा पुरवठा झाला नसल्याने पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. तर येत्या महिन्यात तांदूळही न मिळण्याची शक्यता आहे.

माहे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यातील गहू सप्टेंबर महिना उजाडला तरी मिळाला नाही तर दुसरीकडे अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गहू प्रत्येकी एक किलो कमी करून त्याऐवजी तांदूळ वाढवून देण्यात येत आहे. यावरून सरकारचा दुजाभाव उघड होत आहे. गव्हाऐवजी तांदूळ वितरित करण्यात येत आहे. एवढे मोठे तांदूळ काय करायचे? असे म्हणत लाभार्थी आपापल्या गावात तांदूळ विकत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला तांदूळ विकत असल्याची माहिती समोर आली आहे. शासन चार वर्षांपूर्वी सरकारने शेतकरी लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून प्रति व्यक्ती दरमहा चार किलो गहू व एक किलो तांदूळ वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्याचे वितरणही सुरू करण्यात आले. परंतु या लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून गहू स्वस्त धान्य दुकानातून मिळाला नाही. फक्त माणसी एक किलो तांदुळाचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. आम्हालाच गहू मिळाला नाही तर तुम्हाला कुठून गहू देणार, असे उत्तर स्वस्त धान्य दुकानदार संबंधित लाभार्थ्यांना देऊन आपल्या अंगावरचे घोंगडे झटकून मोकळे होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.

लाभार्थ्यांकडून नाराजी
प्रत्येक लाभार्थ्यांमागे एक किलो गहू कमी करून त्या ऐवजी तांदूळ वाढवून देत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मिळणारा गहू बंद केल्यामुळे लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गहू उपलब्ध करुन द्यावा
शेतकरी बांधवांना गहू उपलब्ध करून द्यावा. तसेच सणासुदीचे दिवस असल्याने रेशन दुकानातून तेल, साखर व हरभऱ्याची डाळ ही द्यावी.
-रवी महाले, तालुकाध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना

बातम्या आणखी आहेत...