आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकृती चिंताजनक:कुत्रा आडवा आल्याने ॲपे उलटला; चार जण जखमी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या ॲपेसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे प्रवासी ॲपे रस्त्याच्या बाजूला जावून उलटला. या अपघातात ॲपेमधील चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बुलडाणा-देऊळघाट मार्गावरील हॉटेल विसावा जवळ घडली. चरणसिंग राठोड (३५) असे गंभीर झालेल्या जखमीचे नाव आहे.

देऊळघाटचे दोघे व पळसखेड नाईक येथील दोघे असे चार जण काही कामानिमित्त प्रवासी ॲपेने देऊळघाटवरुन बुलडाण्याकडे येत होते. हॉटेल विसावाजवळ येताच अचानक ॲपे समोर कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ॲपे रस्त्याच्या बाजूला उलटला. जखमींपैकी चरणसिंग वामन राठोड (३५) रा. पळसखेड नाईक यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. तर इतर तिघांना किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. वृत्त लिहिपर्यंत किरकोळ जखमीची नावे समजू शकली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...