आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेत संपर्क:बेरोजगार युवकांनी‎ बँकेत संपर्क‎ साधण्याचे आवाहन‎‎

‎बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री रोजगार ‍‎ निर्मिती कार्यक्रमामध्ये बेरोजगार‎ युवक, युवतींनी अर्ज दाखल केले‎ आहेत, त्यांनी कर्ज प्रकरणाबाबत‎ बँकेशी संपर्क साधावा, असे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎ ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित‎ बेरोजगार युवक, युवतींसाठी‎ स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध‎ संधी विचारात घेऊन उद्योजकतेला‎ चालना देणारी व सर्जनशीलतेला‎ कालानुरूप वाव देणारा मुख्यमंत्री‎ रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु‎ केलेला आहे.

या योजनेस ‍जिल्ह्यात‎ चांगला प्रतिसाद मिळत आहे.‎ ऑनलाईन पोर्टलवर युवक, युवतींनी‎ कर्ज प्रस्ताव सादर केले आहेत,‎ त्यांनी पोर्टलवर अपलोड केलेले मुळ‎ कागदपत्र, तसेच ज्या जागेवर उद्योग‎ व्यवसाय सुरु करणार आहे, त्या‎ जागेचा उतारा, भाड्याची जागा‎ असल्यास मालकाचे संमतीपत्र,‎ मशिनरी, फर्निचर व इतर वस्तूंसाठी‎ लागणारे दोन-तीन प्रकारचे‎ तुलनात्मक कोटेशन्स, वीज जोडणी‎ सुविधा उपलब्ध असल्याबाबत‎ अलीकडील वीज बील भरल्याची‎ पावती, पाणीपुरवठा सुविधा,‎ आवश्यकतेप्रमाणे परवाने आदी‎ कागदपत्रांसह अर्ज केलेल्या बँक‎ शाखेत तातडीने संपर्क साधावा.

बँक‎ अधिकारी आवश्यक कागदोपत्राची‎ छाननी करुन कर्ज मंजुरीसाठी त्वरीत‎ निर्णय घेतील. याबाबत अध्यक्ष‎ जिल्हास्तरीय कार्यबल समिती‎ मुरोनिक तथा जिल्हाधिकारी यांनी‎ जिल्हास्तरीय कार्यबल समिती सभेत‎ अंमलबजावणी यंत्रणा व सर्व बँक‎ अधिकारी यांना सुचना दिल्या‎ आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे‎ महाव्यवस्थापक यांनी कळवले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...