आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद भरती‎:शासकीय औद्योगिक‎ प्रशिक्षण संस्थेत मानधन‎ तत्वावर अर्ज आमंत्रित‎

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण‎ संस्था खामगाव या आस्थापनेवर‎ नियमित शिल्प निदेशक निव्वळ‎ तात्पुरत्या स्वरूपात मानधन‎ तत्वावर, तासिका शिल्प निर्देशक‎ भरणे आहे. मशिनिस्ट २, टर्नर २,‎ शीट मेटल वर्कर १, वेल्डर १ ,‎ यांत्रिक कर्षी १ , फीटर १, यांत्रिक‎ इलेक्ट्रॉनिक्स १ , फाऊड्रीमन १ ,‎ गणित तथा चित्रकला निदेशक २ ,‎ एम्प्लॉयबिलिटी स्किल १ इत्यादी‎ व्यवसायासाठी शिल्प निदेशक‎ यांची आवश्यकता आहे. शैक्षणिक‎ पात्रता व अधिक माहिती करिता‎ www.dgt.gov.in/cts या‎ वेबसाईटवर पहावे.

पात्रता धारक‎ उमेदवारांनी बुधवार, दि.५ एप्रिल‎ रोजी दुपारी बारा वाजता संपुर्ण‎ प्रमाणपत्रासह, स्वखर्चाने प्रत्यक्ष‎ मुलाखतीसाठी औद्योगिक प्रशिक्षण‎ संस्था, जलंब रोड खामगाव येथे‎ हजर राहावे. अनुभवी उमेदवारांना‎ प्राधान्य दिले जाईल. पदांची संख्या‎ कमी अधिक होण्याची शक्यता‎ नाकारता येत नाही. पद भरती‎ प्रक्रिया रद्द करण्याचे वा पुढील‎ कार्यवाहीसाठी अधिकार प्राचार्य‎ औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना‎ राहतील.‎