आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:युवा सेना सहसचिवपदी ऋषी जाधव यांची नियुक्ती; ठिकठिकाणी सत्कार

मेहकर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव यांची युवा सेना सहसचिव पदी नियुक्ती झाली असून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचा ठिकठिकाणी सत्कार केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव यांची सहसचिव पदी नियुक्ती केली आहे. ऋषी जाधव यांनी युवा सेना सचिव वरून सरदेसाई, खासदार प्रतापराव जाधव, आ. डॉ.संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात युवा सेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम, आंदोलने केली. त्याची दखल घेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सहसचिव पदी नियुक्ती केली.

त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र अर्बन परिवार व युवा सेनेने आतषबाजी करत ऋषी जाधव यांचा सत्कार केला. यावेळी भूषण घोडे, शुभम राऊत, गोपाल देशमुख, प्रशांत साबळे, अमोल ठोकरे, ओम राऊत, हर्षल गायकवाड, शाबीर गवळी, पीयूष केळे, सागर कडभणे, अभिजित घोडे, आक्का गायकवाड, सरपंच अनिल सावंत, विष्णू तांगडे, विजय गाडे, बाळू जाधव उपस्थित होते. येत्या १५ जून रोजी ऋषी जाधव हे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सोबत अयोध्या जाणार आहेत. पक्षाने टाकलेली जबाबदारी बजावण्यासाठी सदैव तत्पर राहू अशी प्रतिक्रिया ऋषी जाधव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...