आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी:वाहक-चालक पदाच्या नियुक्त्या लवकरच ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार श्वेता महाले यांना आश्वासन

चिखली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०१९ मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक, चालक पदाच्या भरती प्रक्रियेत पात्र आणि प्रशिक्षण झालेल्या वाहक चालक पदाच्या नियुक्त्या देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ.श्वेता महाले यांच्या नेतृत्वात भेटायला गेलेल्या वाहक, चालक प्रशिक्षणार्थींच्या शिष्ट मंडळाला दिले आहे.

आ.श्वेता महाले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांच्या मुंबई येथील नंदनवन या बंगल्यात वाहक, चालक, पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांच्या शिष्टमंडळाने १८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली. राज्यात दुष्काळग्रस्त सरळ सेवा भरती सन-२०१९ अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाने चालक व वाहक पदा करिता राज्यभरातून जवळपास १५८ महिलांची निवड केली होती. १८ नोव्होंबर२०१९ पासुन त्यांचे स्व खर्चाने प्रशिक्षण विभागीय स्तरावर सुरू असुन सन-२०२२ संपायला आले तरी त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. तसेच २६०० पुरुष वाहक चालक पदासाठी प्रशिक्षण पुर्ण झालेले असुन त्यांना सुद्धा अजून नियुक्त्या दिल्या नाही. २०१९ मध्ये भरती प्रक्रियेतील महिला आणि पुरुष वाहक चालक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण ही पूर्ण केले. परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप नियुक्त्या दिल्या नसल्याने याबाबत राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या कडून माहीती घेउन तातडीने नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी आ. श्वेता महाले व चालक वाहकांना दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...