आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्त्या जाहीर:जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य‍ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संपर्कप्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या सूचनेवरून बुलडाणा जिल्हा शिवसेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची माहिती खा. जाधव यांचे कार्यालयातून देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. जिल्हा संपर्कप्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव, खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार डॉ.संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, शिवसेना नेते मा.खा.आनंदराव अडसुळ, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडकर, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुखपदी शांताराम दाणे (जळगाव जामोद-मलकापुर विधानसभा), प्रा.बळीराम मापारी (खामगाव-मेहकर विधानसभा), ओमसिंग राजपुत (बुलडाणा-चिखली विधानसभा) मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणुन सिंदखेड राजा विधानसभेचे बाबुराव मोरे, देऊळगाव राजा दिपक बोरकर , मलकापूर विधानसभा संतोष डिवरे, खामगाव विधानसभा संजय अवताडे, चिखली विधानसभा शिवाजीराव देशमुख, जळगाव जामोद विधानसभा राधाकिसन मिरगे, बुलडाणा विधानसभा भोजराज पाटील , जळगाव जामोद विधानसभा राहुल मारोडे व मेहकर विधानसभा उप जिल्हा प्रमुख पदी राजुभाऊ गाडेकर यांची निवड करण्यात आली.

शहर प्रमुख असे : बुलडाणा शहरप्रमुख - गजेंद्र दांदडे, मोताळा- सुरेश खर्चे, देऊळगाव राजा- गोपाल व्यास, सिंदखेडराजा- बालाजी मेहेत्रे, नांदुरा- अनिल जांगडे, मलकापुर- किशोर नवले, खामगाव- ॲड. रमेश भट्टड, चिखली- विलास घोलप, शेगाव- संतोष घाटोळ, मेहकर- जयचंद बाठीया, लोणार- पांडुरंग सरकटे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...