आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता ; 8 जूनपर्यंत सादर कराव्यात

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम१९६१ मधील विविध कलमान्वये जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुक २०२२ होणार आहे. त्यानुषंगाने प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या प्रारूप रचनेची प्रसिद्धी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास ३१ मे रोजी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना २ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर ज्या नागरिकांना सूचना व हरकती दाखल करावयाच्या असल्यास त्यांनी ८ जूनपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात याव्यात. त्यासाठी २ जुन रोजी परिशिष्ट ३ व ३ अ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निवडणूक विभाग २२ जूनपर्यंत गण रचना अंतिम करणार आहे. अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...