आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नांना यश:चिखली येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीला मान्यता

चिखली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सीएसएमसी मान्यताप्राप्त बीएलसी प्रकल्पांना राज्य शासनाचा अनुज्ञेय निधी महाराष्ट्र निवारा निधीतून वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतल्याने चिखली शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी आ. श्वेता महाले यांच्या प्रयत्नाने ४४ लाखांचा निधी मंजूर झाला असल्याने घरकुल धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. श्वेता महाले यांनी २८ जुलै रोजी निधी मागणीचे पत्र दिले होते. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश प्रधान सचिव, गृह निर्माण यांना दिले होते. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ५ ऑगस्ट रोजी निधी वितरणाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. चिखली नगर परिषद हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सादर केलेल्या बीएलसी-४ या घटकांखालील प्रकल्पाला केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने चिखली नगर परिषद येथे ८ डीपीआर मंजूर झालेले असून त्यामध्ये १४३५ घरकुले मंजूर आहेत. घरकुलांच्या एकूण किंमती पैकी राज्य शासनाकडून १३९१ लक्ष तर केंद्र शासनाचा ६८१ लक्ष रूपये निधी प्राप्त झालेला आहे.

तर राज्य शासनाचा एकूण रु.४४,००,००० व केंद्र शासनाचा एकूण रु. १४,७९,५०,००० असा एकूण रु.१५.१५,५०,००० एवढा निधी अप्राप्त आहे. शहरातील पात्र घरकुल धारकांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन घरकुलांचे काम केलेले आहे. शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने घरकुल धारक आर्थिक अडचणीत आहे. त्यांना घरकुल बांधकामाचे लवकरात लवकर पैसे मिळायला पाहिजे त्यासाठी राज्य सरकारला पत्र दिले होते. त्यामुळे राज्य शासनाचा निधी आहे. आता केंद्र सरकारचा निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे निधी मागण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यामूळे लवकरच केंद्र सरकारचा निधी उपलब्ध होऊन चिखली शहरांतील सर्व पात्र घरकूल धारकांना मिळणार असल्याचा विश्वास आ. श्वेता महाले यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...