आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा विधानसभा मतदार संघात आमदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाडयांनी ५०बु्द्ध विहार एकाच वेळी उभारण्याचे काम हाती घेतले असून याकरता चार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बुलडाणा व मोताळा या ठिकाणी बुद्ध विहार उभे करण्यात यावे, अशी मागणी मागासवर्गीय समाजाने आ. संजय गायकवाड यांच्याकडे केली होती. त्यानुसार शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत वर्ष २०२२ या वर्षा करिता जिल्ह्यातील कामांना शासन स्तरावर विशेष मंजुरी देण्यात आली आहे. सदर कामात विविध विकासकामांसह बुलडाणा विधानसभा मतदारसंघात तब्बल पन्नास बुद्ध विहारांचा समावेश करण्यात आला आहे.
यासाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सदरचे बुद्ध विहार हे बुलडाणा तालुक्यातील सव, सागवान, हतेडी, कोलवड, तांदूळवाडी, गुमी, डोंगरखंडाळा, वरवंड, सुंदरखेड, जनुना, पाडळी, राजुर, दहिद, तर मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी, खरबडी, चिंचपूर, जहागीरपूर, काळेगाव, जयपूर, फरदापूर, बोरखेड, किनोळा, तरोडा, शिरवा, बोरखेडी, सर्वदा, रोहन खेड, राजुर, शेलापुर, उबाळखेड, पानेरा, बिरसिंगपूर, हनवत खेड आदी गावांचा समावेश आहे. बुलडाणा मतदारसंघात यंदा ५० विहार बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्यावतीने यासाठी निधी व मंजुरी देखील आपणाला मिळाली आहे. येत्या वर्षात आणखी ५० बुद्ध विहार आपण उभारणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.