आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:चोरीचा मोबाइल विकत घेणाऱ्यास अटक; जलंब पोलिसांची कारवाई

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरीचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल घेणाऱ्या एकास जलंब पोलिसांनी शुक्रवार, ९ डिसेंबर रोजी अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मोबाइल जप्त केला.जलंब पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पहूरजीरा येथील संतोष वामन पारसकार (३३) यांचा विवो कंपनीचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीस गेला होता. याबाबत त्यांनी २० मार्च रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सायबर सेल बुलडाण्याच्या मदतीने व तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करुन पोलिसांनी शुक्रवार, ९ डिसेंबर रोजी चोरीचा मोबाइल विकत घेणारा आरोपी विशाल निरंजन वानखडे (३०) रा. माटरगाव यास अटक केली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून मोबाइल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धीरज आर. बांडे, सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव, पोहेका सुभाष चोपडे, चालक धर्मेंद्र निंबाळकर, पोकॉ. गोपाल सोनोने, पोकॉ. संदिप गावंडे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...