आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:राखीव वन क्षेत्राला आग लावणाऱ्याला अटक

जळगाव जामोद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भेंडवळ बीटमधील राखीव वन क्षेत्रास आग लावणाऱ्या एकास वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्यास अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली आहे.

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात येत असलेल्या भेंडवळ बीट मधील राखीव वनक्षेत्रात अज्ञात व्यक्ती आग लावून राखीव वनपरिक्षेत्राचे तसेच वनाचे नुकसान करीत असल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. कटारिया यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांच्यासह वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने भेंडवळ येथील वनपरिक्षेत्राचे धाव घेतली. यावेळी आरोपी रामदास देवचंद सैरीशे, ५४ रा. परसोडा यास आग लावताना रंगेहाथ पकडून त्यास अटक केली.

ही कारवाई जिल्हा उपवन संरक्षक अक्षय गजभिये व सहाय्यक वनसंरक्षक आर. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी कटारिया, वनपाल दंडे, वनरक्षक संदीप देवकर, जी.एस. खोलगडे, आरती पर्वते, नीता फाळके, प्रकाश चितोडे, भगवान जामुनकर व चालक गणेश तराडे यांनी केली आहे. राखीव वनात आग लावणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे. त्यामुळे कोणती व्यक्ती आग लावण्याचे कृत्य करताना आढळून आल्यास त्यांची माहिती वन विभागाला द्यावी, असे आवाहन कटारीया यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...