आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बुलडाणा जिल्ह्यात 4 जूननंतर पावसाचे आगमन; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार आहे. २ जून, ३ जून व ४ जून रोजी पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. त्यानंतर चार जून रोजी विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी त्वरीत पेरणी करु नये. कुदळ शेतात न्यावी व मारावी. जर इंचभर ओल असेल तरच पेरणी करावी, असे मार्गदर्शन पंजाबराव डख यांनी केले.

येथील डॉ.राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात योगेंद्र गोडे यांचे वाढदिवसानिमित्त शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना पंजाबराव डख बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे हे होते. मार्गदर्शक म्हणून कृषी संशोधन केंद्राचे संचालक सी.पी.जायभाये, डॉ. ए.एस.तारु, शेतकरी संघटनेचे राज्य सदस्य नामदेवराव जाधव, विश्वनाथ माळी, वायाळ, भाजप शहर अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, भाजयुमो शहर अध्यक्ष सोहम झाल्टे, विजया राठी आदींची उपस्थिती होती. यावेळी डख म्हणाले की, जून मध्ये १८ ते २० जूनपर्यंत पाऊस येणार. या काळात काही शेतकरी पेरणी करतील. जे शेतकरी राहतील त्यांनी २ जुलै ३ जुलै रोजी पाऊस येईल. तेव्हा पेरणी केली तरी चालणार आहे. नामदेवराव जाधव यांनीही शरद जोशी यांच्या शेतकरी धोरणाबाबत माहिती दिली.

आध्यात्मिक व तंत्रज्ञानाची सांगड घाला
आपण शेतकरी कुटुंबातील असलो तरी पूर्णपणे शेतीबाबत माहिती नाही. मात्र शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे, ही आपली भूमिका राहिली आहे. त्यामुळेच आपण वाढदिवसानिमित्त सामाजिक, आध्यात्मिक असेच कार्यक्रम लोकांसाठी ठेवले आहेत. आजही शेतीबाबतचे आधुनिक तंत्रज्ञान व पावसाबाबत ची माहिती लोकांसमोर मांडण्यासाठी आपला प्रयत्न राहिला आहे. अध्यात्मासोबतच तंत्रज्ञानाची सांगड घालून आपण शेतीचा व्यवसाय करावा, अशी अपेक्षा भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...