आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत चोखामेळा महाराज समता पुरस्कार निवड समितीच्या सहकार्यवाहपदी डॉ. सुनील कायंदे यांची तर अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता अन् सामाजिक एकता या मुल्यांच्या उत्कर्ष अन् संवर्धन कार्यात सक्रिय असलेल्या व्यक्तींना संत चोखामेळा महाराज समता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, पर्यावरण, इ. विविध कार्य परिघात उत्तुंग कार्य करत असलेल्या राज्यातील मान्यवर व्यक्तींची पुरस्कार निवड समिती निर्माण करण्यात आलेली आहे. समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक आणि राजकीय कार्यातील दिग्गज व्यक्तीमत्व, शिक्षण क्षेत्रातील १७ पदव्या घेतलेले लातूरचे माजी खासदार प्रा. डॉ. सुनिल गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून, तर कार्यवाह म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक परिघातील कृतीशील कार्यकर्ते प्रा. अमेय महाजन यांची निवड अध्यासनाच्या वतीने करण्यात आली आहे. सहकार्य वाह म्हणून डॉ. सुनील कायंदे यांची तर सामाजिक कार्यकर्ते अनिल पोलकर व प्रा. विनोद सूर्यवंशी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक एकता अन् राष्ट्रीय एकात्मता या विषयावर जागृतीसाठी संत चोखामेळा अध्यासन केंद्र यांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
सध्या महाराष्ट्रात सर्व पातळीवरून चांगला प्रतिसाद मिळत असलेली, “चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची’ अशी राज्यातील ७ जिल्ह्यातून १३२० किलोमीटर समता प्रबोधन प्रवास करणारी मंगळवेढा ते देहूगाव ही समतावारी हा एक अध्यासनाचा उपक्रम आहे. संत चोखामेळा महाराज समता पुरस्कार समाजात बंधुभाव वाढीस लागावा यासाठीच्या उपक्रमातील एक महत्वाचा भाग आहे. समता, मानवता, सामाजिक लोकशाही अन् बंधुता या चतुसुत्रीच्या मार्गाने पुढे जात एकसंघ अन् आश्वासक समाज निर्माण व्हावा, ही संत चोखामेळा अध्यासन केंद्राची आग्रही भूमिका आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.