आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:काँग्रेसचा पराभव होत असल्याने जळगाव जामोदवर दावा करणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

मलकापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही तीन ते चार टर्ममध्ये जळगाव जामोद विधानसभेत मतदार संघातून काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असल्याने या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. तर राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकीचे संकेत देत असतानाचा नितीन गडकरी यांच्यामागे कोणीतरी लागल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपवर टीकास्त्र सोडले.

बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी मलकापूर येथे पक्षाची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून जयंत पाटील बोलत होते. विचार पिठावर आमदार एकनाथ खडसे, माजी पालकमंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, राकाँ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, राकाँ जिल्हा उपाध्यक्ष संतोष रायपुरे, प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी संघटितपणे कामाला लागण्याचे आवाहन केले. यावेळी आ.एकनाथराव खडसे, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, अ‍ॅड.नाझेर काझी यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.आढावा बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला. कार्यकारणी, सभासद नोंदणी, बूथ कमिट्या, पक्षांतर्गत निवडणूक, आगामी जि.प, पं.स., न.प. निवडणुकीची तयारी, राबवलेले उपक्रम याबाबत माहिती जाणून घेतली. कार्यक्रम यशस्वितेसाठी मलकापूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जलसंपदा मंत्री म्हणून अजितदादांचे काम रुजवण्याचा प्रयत्न
या दौऱ्यातून शरद पवार यांचे विचार रुजवण्याचे काम करत आहोत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विविध कामे पूर्ण केली आहेत. जलसंपदा मंत्री म्हणून जिल्ह्यातील कामे आपणही पूर्ण केली असून त्याचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.

पालकमंत्री गेल्याचा आनंद ...
पालकमंत्री यांनी काही दिले नाही. असा आरोप महाविकास आघाडी सोबतची सत्ता गेल्यानंतर खासदार व दोन आमदारांनी केला. खरंतर त्यांना सत्तेपेक्षा पालकमंत्री घरी गेले याचा आनंद जास्त झाला होता. काय दिले नाही. हे त्यांनी सांगितले नाही. मात्र ज्यांच्यामुळे पालकमंत्री घरी जातो तो पालकमंत्री किती मोठा आहे. हे आता समजले. अशी टिका यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.

पालिकेची जबाबदारी अरुण अग्रवाल यांच्यावर
आगामी नगर पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी राकाँ शहराध्यक्ष अरूण अग्रवाल यांच्यावर संघटनात्मक बांधणीची मोठी जबाबदारी यावेळी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आयोजित कार्यक्रमामध्ये सोपवली. जास्तीत जास्त सदस्य पालिकेवर पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गडकरींचे कौतुक, मोदींवर टीका
देशात नितीन गडकरी यांनी केलेले काम सोडलं तर मोदी सरकारचं कुठलंही काम पैलतिरापर्यंत पोहोचले नाही, अशी टीका करत काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती व भाजपच्या संसदीय मंडळातून गडकरींना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपमध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, असेही ते म्हणाले.

जनतेला हे सरकार रुचलेले नाही
राज्यातील सत्ता उलथवून भाजपने लोकशाहीचा अवमान केला आहे. आगामी निवडणुकीत हाच निवडणूक कार्यक्रम भाजपा जनतेसमोर मांडणार का? असा सवाल करत पाटील यांनी शिंदे-भाजप सरकारलाही लक्ष्य केले. हे सरकार ५० खोक्यांच्या देवाण घेवाणीतून निर्माण झाल्याचा आरोपही केला. जनतेला हे सरकार रुचेल असे वाटत नाही, असे मतही पाटील यांनी मांडले.

बातम्या आणखी आहेत...