आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोताळ्यातील प्रकार‎:ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर‎ नसल्याने रुग्णांची हेळसांड‎

मोताळा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामीण रुग्णालयात वेळेवर डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने ‎रुग्णांची हेळसांड होत आहे.‎ परिणामी रुग्णांना आर्थिक भूर्दंड‎ सहन करून खासगी रुग्णालयाचा ‎ ‎ आधार घ्यावा लागत आहे. रुग्णांची ‎हेळसांड थांबवण्यासाठी ग्रामीण ‎ ‎ रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून ‎ ‎ देण्यात यावे, अशी मागणी रुग्ण व ‎ ‎ त्यांचे नातेवाईक करत आहेत.‎ तालुक्यातील गरजू रुग्णांना‎ वेळेवर उपचार मिळावा, यासाठी‎ शासनाने कोट्यवधी रुपये खर्च‎ करून शहरात ग्रामीण रुग्णालयाची‎ निर्मिती केली आहे. या रुग्णालयात‎ शहरासह ग्रामीण भागातील विविध‎ आजाराचे शेकडो रुग्ण‎ उपचारांसाठी येतात.

परंतु‎ रुग्णालयात वेळेवर डॉक्टर‎ उपस्थित राहत नसल्याने रुग्णांची‎ हेळसांड होताना दिसून येत आहे.‎ रुग्णालयात एक वैद्यकीय‎ अधीक्षकाचे पद असून ते रिक्त‎ आहे. तर तीन वैद्यकीय‎ अधिकाऱ्यांचे पद असून त्यापैकी‎ एक पद रिक्त आहे. तर उर्वरित दोन‎ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत,‎ अशी माहिती आहे. रुग्णालयात‎ एकही डॉक्टर उपस्थित राहात‎ नसल्याने येथील रुग्णालय कोण‎ सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित‎ होत आहे. सध्या वातावरणातील‎ बदलामुळे सर्दी, खोकला आणी‎ ताप या आजाराची साथ सुरू आहे.‎ या आजाराचे अनेक रुग्ण‎ उपचारासाठी रुग्णालयात येत‎ आहेत.

परंतु एकही डॉक्टर‎ उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना‎ खासगी दवाखान्याचा सहारा घ्यावा‎ लागत आहे. उपचारासाठी‎ आलेल्या रुग्णांना आयुषचे डॉक्टर‎ सेवा देत आहेत. त्यामुळे डॉक्टरांचा‎ भार आयुषच्या डॉक्टरांवर‎ पडल्याचे दिसून येत आहे. शासनाने‎ कोट्यवधी रुपये खर्च करून‎ बांधलेले रुग्णालय काय कामाचे‎ असा प्रश्न रुग्ण व त्यांचे नातेवाईक‎ उपस्थित करत आहेत. वरिष्ठांनी या‎ गंभीर विषयाकडे लक्ष देऊन येथील‎ ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध‎ करून देण्यात यावे, अशी मागणी‎ करण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...