आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:बस वाहकास मारहाण : गुन्हा दाखल‎

बुलडाणा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी बस उभी करण्याच्या‎ कारणावरून बसच्या वाहकाला‎ शिविगाळ करून मारहाण केली‎ असल्याची घटना शुक्रवार,दि.१० मार्च‎ रोजी तरोडा डी येथे घडली. या प्रकरणी‎ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल‎ केला आहे. शेगाव आगाराची शेगाव ते‎ तरोडा डी बस क्र. एम.एच.४० वाय ५९३१‎ ही बस वाहक सुनील शेषराव धुमाळे हे‎ शेगाव वरून तरोडा येथे बस घेऊन जात‎ होते.

त्यांनी शाळेतील विद्यार्थी व प्रवासी‎ हे तरोडा डी येथे गेले असता वाहकाने‎ गाडगे महाराज मंदिराजवळ एसटी बस‎ उभी केली. त्या ठिकाणी बसमधून शालेय‎ विद्यार्थी व प्रवासी खाली उतरत असताना‎ येथीलच राजेश रामकृष्ण डाबेराव याने‎ वाहकाला म्हटले की, तू येथे एसटी बस‎ उभी करायची नाही असे म्हणून वाहकाची‎ कॉलर पकडून त्याला शिविगाळ केली व‎ त्याच्याजवळ असलेली तिकीट देण्याची‎ मशीन ओढून शासकीय कामांमध्ये‎ अडथळा निर्माण केला व मारहाण केली.‎ बस वाहक सुनील धुमाळे यांच्या‎ तक्रारीवरून जलंब पोलिसांनी आरोपी‎ राजेश डाबेराव त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल‎ केला आहे.

बातम्या आणखी आहेत...