आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापुस:अकोट येथे कापसाला पहिल्यांदाच मिळाला 12 हजार 450 रुपये भाव

अकोट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी, २५ मार्चला कापसाला १२ हजार रुपये भाव मिळाला. शनिवारी भावात पुन्हा वाढ झाली. तब्बल १२ हजार ४५० प्रतिक्विंटलने कापसाची खरेदी झाली. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. यंदा कापसाला विक्रमी भाव मिळणार असल्याचे म्हटले जात होते. ते आता प्रत्यक्षात खरे ठरले असून, शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अखेरच्या टप्प्यात का होईना विक्रमी झळाळी प्राप्त झाली आहे.

शनिवारी बाजार समितीत विक्रमी १२ हजार ४५० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला असून, कापसाच्या दरात होणाऱ्या विक्रमी वाढीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील वाढती मागणी पाहता सध्या फरदडलाही चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येते आहे. दरवर्षी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळत असतो, वर्षाच्या सुरुवातीलाच कापसाला विक्रमी १० हजार भाव मिळाल्याने. अकोट तालुक्यासह शेजारील जिल्ह्यासह परप्रांतातून शेतकरी कापूस विक्रीसाठी अकोट बाजार समितीत दाखल झाले होते.

सुरुवातीपासून तेजी
दरवर्षी बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळत असतो. यंदा देखील वर्षाच्या सुरूवातीलाच कापसाचा दरात तेजी पाहायला मिळाली. मध्यंतरी कापसाचे दर १० हजार ते ११ हजार रु. प्रतिक्विंटल स्थिरावले होते. परंतु, पुन्हा सर्वोच्च १२ हजार ४५० रु. भाव मिळाला.

एवढा भाव मिळण्याचा विचार केला नव्हता
कापसाला एवढा भाव मिळेल, याचा विचार केला नव्हता. १२ हजार ४५० रु प्रति क्विंटल भाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाल्याने आनंदीत आहोत, अशी प्रतिक्रिया निभोरा येथील अरुण बन्सी इंगळे यांनी दिली

बातम्या आणखी आहेत...