आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खेळाडूंनी ऑलिम्पिक खेळाचा ध्यास घ्यावा; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप, मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे प्रतिपादन

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र तथा जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्ह्यातील विविध एकविध खेळांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २२ एप्रिल ते १२ मे या कालावधीत दोन सत्रामध्ये विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विनामूल्य करण्यात आले होते. उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप प्रसंगी मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले की, खेळामध्ये प्राविण्यप्राप्त करणे महत्वाचे असून, त्यापेक्षाही सहभागी होणे महत्वाचे आहे. सहभागी झाल्यानंतरच प्रावीण्य प्राप्तीची आशा असते, प्रत्येकाने आप-आपल्या परीने एका खेळामध्ये सहभागी होणे महत्वाचे असून खेळाडूंनी ऑलिम्पिक खेळाचा ध्यास घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष न.प.मुख्याधिकारी गणेश पांडे तर प्रमुख अतिथी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाचे गजानन घिरके, गोपालसिंग राजपूत, राजेश डिडोळकर, आंतरराष्ट्रीय सायकल संजय मयुरे यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक म्हणून अनिल इंगळे, विजय वानखेडे, समाधान टेकाळे, गणेश सु.जाधव, मनोज श्रीवास, प्रवीण चिम, नीलेश शिदे, चंद्रकांत इलग, राहुल औशलकर, रवी भगत, संजय चितळे, अरविंद अंबुसकर, दीपक इंगळे, सुभाष सोळंके महम्मद सुफीयान, गजानन घिरके दिपक जाधव यांनी खेळाडूंना विविध खेळांचे प्राथमिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले.

शिबिराच्या यशस्वितेकरिता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विजय बोदडे, व्यवस्थापक ए.एच.चांदुरकर,विनोद गायकवाड, कैलास डुडवा, भीमराव पवार, कृष्णा नरोटे, डोंगरदिवे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार यांनी तर आभार अनिल इंगळे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...