आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्याच्या निषेध:अजित पवार यांच्या प्रतिमेला भाजपचे जोडे मारो आंदोलन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी जयस्तंभ चौकात अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त केला.

भाजप नेते योगेंद्र गोडे व शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सिंधूताई खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष विजया राठी, मोताळा तालुकाध्यक्ष यशवंतराव पाटील, बुलडाणा तालुकाध्यक्ष अॅड. सुनील देशमुख, तालुका सरचिटणीस डॉ. राजेश्वर उबरहंडे, शहर सरचिटणीस आशिष व्यवहारे, तालुका सरचिटणीस अॅड.दशरथसिंग राजपूत, भाजप शहर उपाध्यक्षा अॅड. किरण राठोड, माजी नगरसेवक अरविंद होंडे, शहर उपाध्यक्ष हर्षल जोशी, नारायन तोंडीलायता, नितीन श्रीवास, जिल्हा संपर्क प्रमुख सोनू बाहेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष सोहम झाल्टे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस मोहित भंडारी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सतीश पाटील, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस उषा पवार, अल्का पाठक,भाजप महिला आघाडी अध्यक्ष वर्षा पाथरकर,शोभा ढवळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील ठोंबरे, प्रवीण मोतळकर, तालुका सचिव राजेश पाठक, गजानन देशमुख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...