आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:सेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला; आरोपींना पोलिस कोठडी

मोताळा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मूर्ती फाट्याजवळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अनंता दिवाने, शुभम घोंगटे या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या सहा जणांना बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिवसेना उद्धव गटाचे तालुका प्रमुख अनंता दिवाने व युवा सेना उपजिल्हा प्रमुख शुभम घोंगटे हे दोघे १५ नोव्हेंबर रोजी बुलडाणा येथील सभा आटोपून घरी दुचाकीने परत येत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मुर्ती फाट्याजवळ स्विफ्ट डिझायर या वाहनातून आलेल्या सहा जणांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.

ठाणेदार पाटील यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी विकास पाटील, पीएसआय अनिल भुसारी, पोहेकॉ नंदकिशोर धांडे, नापोका दीपक पवार, नापोका विजय पैठणे, राठोड यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत हल्ला प्रकरणातील मंगेश सावळे, गजानन सपकाळ, संभाजी गवळी, शैलेश शर्मा, दादाराव शिंदे आणी अनिल पवार या सहा जणांना ताब्यात घेतले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...