आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न; युवकास चोप‎

नांदुरा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एका‎ अल्पवयीन शाळकरी मुलीस‎ जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तिला‎ पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका‎ युवकास नागरिकांनी पकडून त्याला‎ चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ही‎ घटना आज २ मार्च रोजी सकाळी‎ साडेनऊ वाजेच्या सुमारास‎ नांदुरा-मलकापूर रोडवरील सांगवा‎ फाट्याजवळ घडली. प्रकरणी‎ तक्रारीवरुन त्या तरुणाविरुद्ध गुन्हे‎ दाखल करण्यात आले आहेत.‎

तालुक्यातील एका पंधरा वर्षीय‎ अल्पवयीन मुलीने स्थानिक पोलिसांत‎ दिलेल्या तक्रारीनुसार, आज गुरूवारी‎ सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास‎ नांदुरा येथील शिक्षक शर्मा यांच्या‎ घरासमोर उभी होती. काही वेळानंतर‎ कलीम शहा हा युवक काळ्या रंगाची‎ मोटर सायकल घेऊन त्या ठिकाणी‎ आला. यावेळी त्याने मला जबरदस्तीने‎ दुचाकीवर बसवून मलकापूर रोडने‎ घेऊन गेला. दुचाकीने जात असताना‎ त्याने माझा विनयभंग केला. या‎ तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कलीम‎ शहा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास‎ अटक केली आहे. पुढील पोलिस‎ नांदुरा पोलिस करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...