आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा:शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न, पोलिस आरोपींच्या शोधात

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन आरोपींचा शोध सुरू केला आहे

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. गायकवाड यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, गाडीचे सायरन वाजल्याने प्रकार उघडीस आला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घटना घडली. आमदार संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. रात्री दीड वाजता ते घरी परत आले. तीन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन वाहनाच्या इंधन टाकीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. यादरम्यान परिसरातील विद्युत पुरवठाही आरोपींनी तोडल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी घटनास्थळी दाखल होऊन तपास केला आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कुणीतरी हे काम केले असावे. संबंधितांचा शोध पोलिस आणि आमची टीम करत असल्याचे गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...