आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:अतिक्रमणधारकाचा आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिसांनी प्रसंगसावधान घेतले ताब्यात

बुलडाणा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव शहरातील रेल्वे गेट परिसरातील न्यायालयाच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी शुक्रवारी पोलिसांसह महसूल पथक पोहोचल्यानंतर अतिक्रमणधारक दीपक परदेशी यांनी पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे.

रेल्वेगेट परिसरात परदेशी कुटुंबीय राहत असलेली जागा न्यायालयाची आहे. गेल्या काही वर्षांपासून याबाबतचे प्रकरण न्यायालयात सुरू होते. चौकशी समितीच्या अहवालानंतर न्यायालयाने ही जागा अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी नगर पालिका, तहसील प्रशासन पोलिस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणस्थळी पोहोचून जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या. परदेशी यांनी नकार देत वाद घातला. नंतर त्यांनी घरातून आणलेली पेट्रोलची बाटली अंगावर ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दीपक परदेशी यांना ताब्यात घेतले. परदेशी यांना पोलिस ठाण्यात बसून ठेवले. मात्र त्यांनी ठाण्यातून पळ काढला. दरम्यान, परदेशी यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नारळ विक्रेत्याचा कोयता हातात घेऊन पोलिसांच्या अंगावर गेल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...