आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा प्रयत्न:‘त्या’ प्रकरणातील पीडित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न ; बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल केला

बुलडाणा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर येथील अश्लील व्हिडिओ प्रकरणातील पीडित महिलेने २० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ महिलेला ताब्यात घेतल्याने हा आत्महत्येचा प्रयत्न फसला. सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली.

मेहकर येथील माजी स्वीकृत नगरसेवक विकास जोशी यांनी पीडित महिलेवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. याप्रकरणी मेहकर पोलिस स्टेशनला विकास जोशी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक होत नसल्याने मुळे संतप्त पीडित महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून २० जून रोजी महाराष्ट्रात कुठेही आत्महत्या करेल असा इशारा दिला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच पोलिस यंत्रणा महिलेचा शोध घेत होती.

बातम्या आणखी आहेत...