आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आ. सानंदा यांचे प्रतिपादन:ई-श्रम कार्ड वाटपाच्या माध्यमातून ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न; शेकडो कामगारांना दिला श्रम मुल्यांचा मोबदला

खामगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या विधानसभा मतदार संघात सलग तीन वेळा नेतृत्व करताना कामगार आणि त्यांच्या परिवारांनी भरभरुन प्रेम व मतदान रुपी आशीर्वाद देवून सहकार्य केले. कामगारांचे प्रेम आजही आपल्यावर आणि काँग्रेस पक्षावर कायम आहे. कोरोना आपत्ती काळातही आपण कामगारांना अन्नधान्य किटच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला. शहर व परिसरात तळहातावर पोट भरणारे अनेक असंघटित कामगार बांधव आहेत. या कामगार बांधवांना ई श्रम कार्डच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी असंघटित गोर गरीब कामगारांना मोफत ई श्रम कार्ड काढून देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम म्हणजे कामगारांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिली.

महाराष्ट्र दिन, कामगार दिन व माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहन चौक भागात असंघटित कामगार बांधवांसाठी भव्य ई श्रम कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, अतिरिक्त उपविभागीय अधिकारी विजय पाटील, तहसीलदार अतुल पाटोळे, शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा अलकादेवी सानंदा, माजी नगराध्यक्षा सरस्वती खासने, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुरजितकौर सलुजा, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, मोहन परदेसी, प्रीतम माळवंदे, शारदा शर्मा, मधुसूदन अग्रवाल, संतोष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम माजी आमदार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त किशोरआप्पा भोसले यांनी त्यांचा सत्कार केला व स्मृती चिन्ह देवून वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.

या शिबिरात जवळपास अडीचशे कामगारांनी आपल्या नावाची नोंदणी केली. नाव नोंदणी झालेल्या कामगारांना माजी सानंदा व मान्यवरांच्या हस्ते मोफत ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी किशोरआप्पा भोसले, प्रीतम माळवंदे, रितेश पवार, श्रीकांत राऊत, सोनू जाधव, चेतन चंदन, रोहित मारवाल, स्वप्नील धानोकार, आकाश गोमासे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला धनंजय वानखडे, नीलेश भोसले, प्रमोद महाजन, आदित्य राजपुत, माजी नगरसेवक दिनेश अग्रवाल, दिलीप जाधव, अमर पिंपळेकर, प्रमोद मोरे, प्रमिला चोपडे, सुलोचना कळींगकर, पंकज पुरी, शारदा शर्मा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...