आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने केला खुलासा:काँग्रेसने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न; उमरखेड येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रकार परिषदेतून खुलासा

उमरखेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह उमरखेड विधानसभेमध्ये विविध विकास कामे महाविकास आघाडीने मंजूर केली. झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या कामांसाठी कोट्यवधींची तरतूद देखील केल्याचे पुराव्यानिशी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेतून समोर आणले आहे.

त्याचप्रमाणे कागदपत्रे देखील पत्रकार परिषदेत सादर केल्याने विद्यमान भाजप आमदार श्रेय घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्य सरचिटणीस तातू देशमुख, माजी आमदार विजय खडसे, जिल्हा सरचिटणीस अविनाश अग्रवाल, तर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, अल्पसंख्यांक आघाडीचे सोनू खतीब यांनी केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण उमरखेड येथे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आले होते. त्यांनी उमरखेड तालुक्याच्या विकासासाठी ५० कोटी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार येथील विश्रामगृहाच्या इमारत बांधकामासाठी ६ कोटी ७९ लाख, तर प्रशासकीय इमारतीकरिता १४ कोटी ८० लाख रुपयांचा या निधी मंजूर करून आणल्याचा खुलासा केला. याशिवाय विधानसभेतील कोट्यवधींची कामे देखील मंजूर झाल्याचे इतिवृत्त पत्रकार परिषदेमध्ये सादर केले. असे असताना विद्यमान भाजप आमदार मंजूर झालेल्या कामाचे श्रेय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी झालेल्या कामाची दखल घेत राज्य शासनाने आयोजित एका स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.

तब्बल सव्वादोन कोटी रुपयांतून शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाचे बांधकाम भूमीपूजन अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपने करू नये, असे जर केले असेल तर कागदपत्रे दाखवून खुलासे सादर करावे, असे जाहीर आवाहन देखील पत्रकार परिषदेतून देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सोनू खतीब यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...