आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कुत्रा समोर आल्याने ऑटोची झाडाला धडक; चालकाचा मृत्यू

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोताळा येथून मलकापूरकडे जाणारी अॅपे रिक्षा कुत्रा आडवा आल्यामुळे कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडावर धडकल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास मोताळा ते मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यावर घडली. या अपघातात ऑटो चालकाचा मृत्यू झाला तर ऑटोतील प्रवासी जखमी झाले.

येथील शे.शाहरुख हा युवक त्याच्या एम.एच. २८ आर. ३११४ या क्रमांकाची अॅपे रिक्षामध्ये प्रवासी घेऊन रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मोताळा येथून मलकापूरकडे जात होता. नळगंगा फाट्यावर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो चालकाचे नियंत्रण सुटून अॅपे रिक्षा झाडावर धडकली. या अपघातात चालक शे. शाहरुख गंभीर जखमी झाला तर ऑटोत असलेले प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये सुनंदा सोनोने व शीतल सोनोने या दोघांना किरकोळ मार लागला असून, गुलाब सोमस यांच्या हाताला टाके पडल्याचे समजते तर इतर जखमी प्रवाशांबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने ऑटो चालकास तातडीने बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी ऑटो चालक शे. शाहरुख याला मृत घोषीत केले. वृत्त लिहेपर्यंत बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...